अभिनव विद्या मंदिर, पूर्व प्राथमिक विभाग कल्याण(प)
शाळेचा इतिहास –
अभिनव विद्यामंदिर ची पूर्व प्राथमिक शाळा ही छत्रपती शिक्षण मंडळाच्या संस्थेची पहिली शाळा आहे. शाळेच्या पूर्वीची विद्यार्थी संख्या 60 होती. सन 2004 मध्ये सौ सायली चंद्रकांत धोंडे या मुख्याध्यापिका म्हणून आल्या व विद्यार्थी पटसंख्या 262 वर गेली असे ज्ञानदानाचे कार्य 1975 सालापासून सुरू आहे.
शाळेमध्ये रेतीबंदर सापडे उंबर्डे गाव कोनगाव, वाडेघर, कोळीवाडा, गोविंदवाडी या ठिकाणाहून विद्यार्थी येत असतात परिसरातील अतिशय गरीब व गरजू कुटुंबातील मुले शिक्षण घेण्यासाठी येत असतात. शाळेचे एकच ध्येय आहे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देणे . आणि म्हणून शाळेमध्ये राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाची ओळख यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.