मंगळवार दि. 12 डिसेंबर 2023 रोजी शाळेत ‘कृतज्ञता समारोहाचे’ आयोजन केले गेले. कै. मोतीराम कृष्णाजी नाखवा यांचे नातू श्री. सुभाष नाखवा यांनी कॅनरा बँकेच्या सी.एस.आर. फंडातून शाळेच्या संगणक कक्षासाठी ८ संगणक उपलब्ध करून देण्याबाबत दीड लाख रकमेची देणगी शाळेस दिली. त्या निमित्ताने आज शाळेच्या वतीने कॅनरा बँक, श्री. सुभाष नाखवा व नाखवा परिवार यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमास श्री. सुभाष नाखवा यांचे बंधू श्री. किशोर नाखवा, भगिनी कृष्णकुमारी नाखवा, कॅनरा बँकेचे ठाणे शाखेचे चीफ मॅनेजर श्री. विनायक पाटील, तसेच श्रुती दळवी याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक श्री. आवटे सर, जिजाई बाल मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. गवस मॅडम, नाखवा हायस्कूलचे माजी मुख्या. श्री. पाठक सर, शाळेचे माजी शिक्षक व शालेय समिती सदस्य श्री. राव सर हे मान्यवर उपस्थित होते. माजी विद्यार्थी श्री. संतोष पाटील, शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.