“छत्रपती शिक्षण मंडळ *अविष्कार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2023-24 अंतर्गत विज्ञान प्रकल्प सादरीकरण* स्पर्धा उत्साहात संपन्न ”
छत्रपती शिक्षण मंडळाच्या अभिनव विद्यामंदिर ,कल्याण या शाळेत छत्रपती शिक्षण मंडळातर्फे अविष्कार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा अंतर्गत विज्ञान प्रकल्प सादरीकरणाची अंतिम फेरी शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री श्रीकांत शिनगारे सर (समुपदेशक-मुंबई), विज्ञान अभ्यासक श्री नरेंद्र गोळे सर तसेच श्री. श्रीपाद मुळे सर, छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. नंदकिशोर जोशी सर, भारत विकास परिषदेचे श्री.कृष्णमूर्ती सर उपस्थित होते.
श्रीपाद मुळे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना * अप्रतिम विज्ञान प्रकल्प* बघण्याची संधी मिळाली त्याबद्दल आनंद व्यक्त केला. आपण जे वेगवेगळे उपक्रम शाळांतून राबवतो यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढच होते. सादर केलेले सर्वच प्रकल्प हे सद्यःस्थितीवर आधारित असल्याने त्यासाठी केलेले प्रयत्न हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यातून विज्ञान निष्ठा जोपासली जाते. हे प्रयत्न करताना सौर ऊर्जा, सृजनशीलता, कल्पकता या गोष्टींकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपण जे शिकतो ते रोजच्या आयुष्यात वापरता येईल का? शाळा व समाजासाठी हे वैज्ञानिक प्रकल्प खूप फायद्याचे व गरजेचे आहेत.असे मत त्यांनी व्यक्त केले
प्रकल्पाच्या परीक्षण केल्यानंतर व भोजनानंतर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. भारत विकास परिषदेचे श्री. कृष्णमूर्ती सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “फाईव्ह स्टार शाळेतील प्रकल्पांपेक्षा इथल्या प्रकल्पातून बघायला अधिक विज्ञान अनुभवायला मिळाले असे मत मांडले आणि आपणच भारताला पुढे नेणार याबद्दल त्यांनी खात्रीही व्यक्त केली. यानंतर प्रमुख पाहुणे श्री शिनगारे सर यांनी सर्व विज्ञान प्रकल्प पाहून आनंद वाटला असे उपक्रम शाळांतून चालूच राहिले पाहिजेत. प्रकल्प करण्याची आवड तसेच विज्ञानाची आवड ठेवा, प्रकल्पांचा सर्वंकष विचार करा. दैनंदिन जीवनातील समस्यांचा विचार करून त्यावर उपाय करावा*असे मत व्यक्त केले. श्री नरेंद्र गोळे सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून *प्रत्येक विद्यार्थ्याकडे सामर्थ्य आहे यासाठी त्यांनी अरुणिमा सिन्हा यांची गोष्ट सांगितली. तसेच त्यांनी भाषांतरित केलेले “फिरुनी पुन्हा जन्मेन मी” हे पुस्तक विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी भेट दिले. छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री नंदकिशोर जोशी सरांनी एवढा दर्जेदार कार्यक्रम संस्थेने घेतला याबद्द्ल आनंद व्यक्त केला. ग्रामीण भागातून खूप लांबचे अनेक विद्यार्थी प्रकल्पात सहभागी झाले होते. जीवनाकडे बघताना कान व डोळे उघडे ठेवा हे सांगून प्रसिद्ध शास्त्रज्ञांची उदाहरणे दिली. आजच्या विद्यार्थ्यांमधून उद्याचा शास्त्रज्ञ नक्कीच घडेल व भारत बलशाली होईल असा विश्वास व्यक्त केला.
अविष्कार विज्ञान प्रकल्प सादरीकरण यशस्वी शाळा खालील प्रमाणे-
इयत्ता सहावी
प्रथम क्रमांक जनता विद्यालय
धसई. द्वितीय क्रमांक- विवेकानंद संकुल सानपाडा (मराठी माध्यम)तृतीय क्रमांक- विद्यामंदिर मांडा टिटवाळा
इयत्ता सातवी प्रथम क्रमांक विवेकानंद संकुल सानपाडा द्वितीय क्रमांक- नूतन ज्ञान मंदिर कल्याण (पूर्व) तृतीय क्रमांक जनता विद्यालय कर्जत
इयत्ता आठवी प्रथम क्रमांक नूतन विद्यालय, कल्याण द्वितीय क्रमांक- विद्यामंदिर मांडा टिटवाळा. तृतीय क्रमांक नूतन विद्यालय कल्याण
इयत्ता नववी*प्रथम क्रमांक- विवेकानंद संकुल सानपाडा. द्वितीय क्रमांक- नूतन विद्यालय, कर्णिक रोड. तृतीय क्रमांक गंगा गोरजेश्वर विद्यालय फळेगाव.
कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी श्री तरटे सर श्री ना.के. फडके सर श्री ठाकूर देसाई सर संस्थेचे सरचिटणीस श्री निलेशजी रेवगडे सर उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केले अभिनव विद्यामंदिर चे मुख्याध्यापक श्री. गिते सर यांनीही विशेष मार्गदर्शन केले. *श्री बसवराज गोवे सर ही उपस्थित होते. संस्थेतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, तसेच प्रकल्प तयार करण्यासाठी मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक उपस्थित होते. सौ आंबेरकर मॅडम यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार मानले.सौ.उर्मिला जाधव मॅडम यांनी सर्व कार्यक्रम एका सूत्रात गुंफला.सौ.कानेटकर मॅडम यांनी यशस्वी शाळांची नावे वाचली.कार्यक्रमाची सांगता राज्य गीताने झाली. आजच्या या प्रकल्प सादरीकरणाने विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल असाच हा कार्यक्रम होता.