0251 -2209396 / 2200921 | csmandal_kalyan@rediffmail.com

छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्था- एक हायड्रो – इलेक्ट्रिक धरण

   छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्था – एक हायड्रो – इलेक्ट्रिक धरण 

                         “मागेल त्याला शिक्षण ” या ध्येय विचाराने प्रेरित काम करणाऱ्या व निष्काम वृत्तीने शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या  छत्रपती शिक्षण मंडळ  या संस्थेच्या  प्रत्येक घटकांनी शिक्षण संस्थेच्या रूपाने ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यांमध्ये शिक्षणाचे हायड्रो – इलेक्ट्रिक धरण  बांधून ठेवले आहे.या धरणाचा कमांड एरिया म्हणजे ग्रामीण व वनवासी भाग. लोकांच्या परिश्रमातून,श्रद्धेतून आणि आर्थिक योगदानातून हे धारण बांधले गेले.हायड्रो – इलेक्ट्रिक धरण  पाण्याबरोबर वीजपुरवठाही करते. संस्थेच्या या पाण्याने ग्रामीण व वनवासी भागातील सामाजिक जमीन भिजवली.सांस्कृतिक जीवन उजळविण्यासाठी  विजपुरवठाही केला. छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेचा पाणीपुरवठा म्हणजे शिक्षण प्रसार आणि वीजपुरवठा म्हणजे सामाजिक जाणिवांची निर्मिती.

शिक्षण जेंव्हा जनसामान्यांच्या दारापर्यंत जावून पोहचते तेंव्हा ते आपल्या सोबत केवळ ज्ञान घेवून जात नाही स्वातंत्र्य, आत्मभान  आणि स्वाभिमानाच्या जाणीवाही सोबत नेते. शिक्षणाची प्रक्रिया ही ज्ञान आणि आत्मभानाची  प्रक्रिया असते.एका अर्थाने ती एक संघर्ष वाहिनी असते. छत्रपती शिक्षण मंडळ या संस्थेची उभारणी करणाऱ्या पदाधिकाऱ्याना शिक्षणात दडलेल्या शक्तीची जाणीव झाली म्हणूनच १ मे १९६० मध्ये शिक्ष्णानाविना अगतिक जीवन जगणाऱ्या ग्रामीण भागातील कष्टकरी, कामगार, मजूर  व वनवासी बांधवांच्या मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा नेवून पोहचविण्याचे भगीरथी कार्य केले. त्याचाच परिणाम म्हणजे आज संस्थेचे अनेक विद्यार्थी विवध क्षेत्रातील मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत.सानपाडा शाळेतील कुमारी प्रियंका बाळकृष्ण भोवड ही विद्यार्थिनी इस्रो मध्ये संशोधकीय काम करत आहे.वनवासी भागातील अनेक विद्यार्थी भारताच्या सैन्य दल व पोलीस सेवेमध्ये मातृभूमीची सेवा करत आहेत.शिक्षणाबरोबरच सामाजिक क्षेत्रात सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासत आहेत.

निष्काम वृतीने विद्यार्थी घडविण्याचे संस्थेचे हे काम राष्ट्रनिर्मिती इतकेच अनमोल आहे.बदलत्या शिक्षण प्रवाहाच्या काळातही नवीन शैक्षणिक धोरण या सारख्या बदलांना सामोरे जाण्यासाठी संस्था सज्ज आहे. किंबहुना त्याची पूर्व तयारी अगोदरच सुरु केली आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण असो अथवा विज्ञान  विषयक जाणजाणीवा विकसित  करणारे विज्ञान प्रदर्शन असो तसेच स्वानुभवाचा साक्षात्कार जागा करणारा शिवतेज सारखा उपक्रम असो. यातून शिक्षक आणि विद्यार्थी जाणीवपूर्वक घडविण्याचा संस्था सृजनशील प्रयत्न करीत आहे. समाज निर्मितीच्या व राष्ट्र निर्मितीच्या या सहृदय कार्याचा मी ही एक घटक असल्याच्या  आत्मसन्मानाचा सुखद अनुभव देवून जाते.

विलास वाव्हळ

मुख्याध्यापक

माध्यमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा

नवी मुंबई

mob no. 7977239437

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top