आज दिनांक 21 मार्च 2024 रोजी आपल्या जिजाई बाल मंदिर प्राथमिक/मो.कृ. नाखवा हायस्कूल ठाणे शाळेत जागतिक वन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष -निसर्गप्रेमी छायाचित्रकार मा.श्री प्रकाश कदम सर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी स्वतः वनांवर आधारित तयार केलेली शॉर्ट फिल्म विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली.जागतिक वन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वनांचं संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी किमान एक तरी झाड लावावे. असा संकल्प प्रत्येक विद्यार्थ्याने करावा असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वर्ग तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.ऋतुजा गवस मॅडम,माध्यमिक विभाग मुख्याध्यापक श्री.बबन निकुम सर उपस्थित होते. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. ऋतुजा गवस ह्यांनी श्री.प्रकाश कदम ह्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तसेच श्री.कदम सरांचा परिचय करून दिला व आजच्या दिवसाचे महत्वही सांगितले.
माध्यमिक विभागाचे श्री.गोरे सर ह्यांनीही विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन केले.