जिजाई बाल मंदिर ठाणे शाळेत शिक्षण विवेक वर्धापन दिन उत्साहात साजरा !दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी शिक्षण विवेकचा दहावा वर्धापन दिन संपन्न झाला. मुख्याध्यापक ,शिक्षकांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ. ऋतुजा गवस यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण विवेक अंकाची पूर्ण माहिती सांगितली आणि परिपाठामध्ये विद्यार्थ्याकडून अंकाचे वाचन करून घेण्यात आले. विद्यार्थ्यांना शब्दकोडे कसे सोडवावे सविस्तर मार्गदर्शन केले .आपल्या शाळेची बातमी फोटो आलेले पाहून विद्यार्थी खूप आनंदीत व हरखून गेलेले होते. शिक्षण विवेक वाचिक भाषिक चळवळ वाचन संस्कृती रुजवण्यासाठी असलेली असलेले एक शैक्षणिक मासिक !या मासिकातून खऱ्या अर्थाने विवेकातून विवेक !पुनश्च एकदा शिक्षण विवेकला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐
सौ.ऋतुजा रवींद्र गवस
मुख्याध्यापक
जिजाई बालमंदिर ठाणे