छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण
पी. आर. म्हैसकर प्रा. विद्यामंदिर , डोंबिवली पूर्व
सन २०२३-२४
शाळेचे नाव – पी. आर. म्हैसकर प्रा. विद्यामंदिर, डोंबिवली पूर्व
शाळेचा पत्ता – राजाजी पथ, रामनगर पोलीस स्टेशन जवळ, डोंबिवली पूर्व
मुख्याध्यापिका – सौ. भिमा ईश्वर पवार
संपर्क क्रमांक – ९०४३४४६८८
एकूण विद्यार्थी संख्या – १०३
परीक्षेचा निकाल – प्रथम आलेले विद्यार्थी वर्गनिहाय
इयत्ता पहिली – कु. प्रणव अविनाश विटेकर
इयत्ता दुसरी – कु. रुद्र दिनकर महादे
इयत्ता तिसरी – कु. नासिया परवीन नुरुल्लाह
इयत्ता चौथी – कु. कृष्णा पांडुरंग रायकर
शाळेत दरवर्शी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम घेतले जातात.
राबवलेले विशेष उल्लेखनीय उपक्रम –
शाळेने महिला पालकांसाठी पाककला स्पर्धा आयोजित केली होती , त्यात महिला पालकांनी भाग घेऊन डाळींचे विविध चविष्ट पदार्थ बनवुन आणले होते , विजयी पालकांना बक्षिस देण्यात आले.
इयत्ता १ली ते ४थीच्या विद्यार्थ्यांसाठी नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले , रंगपंचमी निमित्त फुलांपासुन नैसर्गिक रंग कसे तयार करावे ते कार्यशाळेमधुन मुलांना शिकवण्यात आले , विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी शिबिर घेण्यात आले.
विशेष उल्लेखनीय बाबी –
१ – श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी शाळेत श्रीरामाचा उत्सव आयोजित करण्यात आला , त्यानिमित्ताने कारसेवकांचा सत्कार करण्यात आला , कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन ह. भ. प. कु. ज्योत्स्ना रविंद्र गाडगीळ व नागरी सहकारी बँकेचे डायरेक्टर श्री. मिलिंद आरोलकर उपस्थित होते , सर्वाना रामरक्षा पठण केले , सर्वाना प्रसाद देण्यात आला.
२ – शाळेतील सहशिक्षिका सौ. रुपाली महेंद्र राऊत यांना रोटरी क्लबतर्फे नेशन बिल्डर अवार्ड हा पुरस्कार मिळाला.
३ – दासनवमी निमित्त झालेल्या आंतरशालेय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत शाळेतील एका विद्यार्थ्याला बक्षीस व प्रमाणपत्र मिळाले , १ – आयेशा अहमद मुल्ला इ. २ री
४ – विज्ञान दिन निमित्त २८ फेब्रुवारी २४ रोजी प्रश्नमंजुशा घेण्यात आली , व इ. ३ री व ४ थीच्या मुलांनी छोटे प्रयोग सादर केले .