संस्थेच्या गंगा गोराजेश्वर विद्यामंदिर फाळेगांव शाळेने दि. १३.११.२०१४ गुरुवार रोजी पाणी अडवा पाणी जिरवा या उद्देशाने फळेगांव परिसर आरेला रस्त्याच्या बाजूला वनराई बंधारा उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते मी. अनंता रघुनाथ जाधव यांनी एक ट्रक मातीची व्यवस्था करून दिली व शाळापातळीवर १०० गोणपाट पिशव्या उपलब्ध करून वनराई बंधारा बाधण्यात आला. या उपक्रमाचे फाळेगांव ग्रामपंचायत सरपंच मी. चंद्रकांत भोईर आणि सामाजिक कार्यकर्ते मी. अनंता रघुनाथ जाधव यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या मानदानाने आपली एक सामाजिक बांधिलकी या नात्याने या वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले.